मुखेड – शिस्त, नेतृत्व, जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांची बीजे विद्यार्थीदशेतच रोवण्याच्या उद्देशाने विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी येथे नवनिर्वाचित विद्यार्थी संसदेचे उद्घाटन आणि शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. अशा कार्यक्रमातूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीची पायाभरणी होते असे स्पष्ट प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक राजसाहेब कदम यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक राजेसाहेब हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मानद प्राचार्य गोविंद चव्हाण हे उपस्थित होते .
यावेळी मुख्याध्यापक संदीप
गेटकेवार, मुख्याध्यापक संदीप परकंठे, प्राचार्य भगवान मरकटवाड, कवी वैजनाथ गीते, प्राचार्य सोपानराव शिंदे , प्राचार्य अंकुश गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. आ. किशनराव राठोड व संस्थापक सचिव स्व. आ. गोविंदराव राठोड आणि भारतीय संविधान यांचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
शाळेच्या वतीने प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रसिद्ध साहित्यिक राजेसाहेब कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री , विविध खात्यांचे मंत्री व प्रतिनिधींनी संविधानाला साक्ष ठेवून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्यासाठी पद व गोपनीतीची शपथ देण्यात आली.
“अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवूनच खरे नेतृत्व शालेय विद्यार्थी संसद आणि शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घडते,” असे प्रतिपादन प्रमुख अतिथी राजेसाहेब कदम यांनी आपल्या भाषणात केले.
अध्यक्षीय समारोप प्राचार्य गोविंद चव्हाण यांनी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शालेय मंत्रिमंडळ ही केवळ पदांची मिरवणूक नसून शिस्त, सेवा आणि संघभावनेची प्रयोगशाळा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता, सहकार्य व जबाबदारी जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी विविध खात्यांचे वाटप जाहीर करण्यात आले. स्वच्छता, शिस्त, शिक्षण, माहिती व प्रसारण, आपत्ती व्यवस्थापन, सांस्कृतिक, क्रीडा, , पर्यावरण, शालेय शिष्टाचार व मूल्य संवर्धन, विद्यार्थी कल्याण आदी खात्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्याचा अनुभव मिळणार आहे.
शालेय मंत्रिमंडळ पुढील प्रमाणे आहे.
मुख्यमंत्री राहुल संभाजी शिरसाट, उपमुख्यमंत्री कु. संध्याराणी ज्ञानोबा श्रीकंठे,
उपमुख्यमंत्रीकु. वैशाली मोरे, मंत्री कु. तनुजा गेरकर, अमोल राठोड, विकास राठोड, प्रतिज्ञा दराडे, आयुष पोपळे, सई हिवराळे, अंजली गर्जे, निशा वल्लेभ, प्रवीण राठोड, अश्विनी पवार, जान्हवी धरपडे, आरुषी जाधव, यांनी मंत्रिपदाची तर राज्यमंत्री म्हणून कु. राणी राठोड, कु. सरस्वती राठोड यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
यावेळी मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री कु. संध्याराणी श्रीकंठे व उपमुख्यमंत्री कु. वैशाली मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख यशवंत बोडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशनराव आगलावे यांनी तर आभार अंकुशराव गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशनराव आगलावे, शेषराव वडजे, प्रा. मारोतराव गायकवाड, जगदीश अंबुलगेकर, सुरेंद्र वडगावकर, विजय आडे, प्रकाश पवार, शरद पाटील, दिलीप पाटील आदींनी परिश्रम घेतले.
शालेय मंत्रिमंडळाचा हा शपथविधी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व लोकशाही मूल्ये दृढ करणारा ठरला.
कार्यक्रमास शिक्षक, प्राध्यापक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदे मातरम या सामूहिक राष्ट्रीय गीता नंतर
अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
(ता. प्र.)
























