जालना : आपली पाल्य कु.ध्यानी प्रवेश येवले हिची फिस बाकी राहिल्यामुळे वीर गतसिंग इंग्रजी शाळेचे अध्यक्ष डिगंबर अरुण सरकटे रा. तळणी ता. मंठा यांनी आपणास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदनही देण्यात आले आहे.
दरम्यान, केवळ फीस राहिली म्हणून अध्यक्ष का होईना परंतू अशाप्रकारे पालकांना धमकावू शकत नाही. यामुळे खाजगी इंग्रजी शाळांची दादागिरी वाढली आहे. या ना त्या कारणाने सदरील इंग्रजी शाळांना ह्या विद्यार्थ्यांना वेठीस धरत असून अशा शाळांवर कडक निर्बंध घालावेत, अशी आग्रही मागणी गावकर्यांनी केली आहे.
सदर निवेदनात म्हटले की, कु. ध्यानी प्रवेश येवले ही विर भगतसिंग इंग्शिल स्कुल तळणी ता. मंठा येथे शिक्षण घेत आहे. माझ्या मुलीची फिस बाकी असल्यामुळे दि.30/12/2025 रोजी दुपारच्या सुमारास शाळेच्या गाडीचे ड्रायव्हर श्री.मंगेश पावडे यांच्या दुरध्वनीवरुन मला फोन आला व बाकी राहिलेल्या फिस पेक्षा जास्त फिस ची मागणी केली. त्यानुसार मी त्यांना फिस जास्त देणार नाही, नाहीतर आमचे गावातील सर्व मुले काढून घेईल. आम्हांला परवडत नाही असे सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले की तुम्ही अध्यक्षांना बोलून घ्यापरंतू मी अध्यक्षांना बोललो नाही.
याचे शटर बंद करून याला उघड करुन मारहाण करायची आहे गावात उघडे करून दिंड काढायची आहे. या भितीने मी माझा जिव वाचवून पळालो परंतू त्यांनी धमकी दिली की, याचे शटर बंद करुन याला उघड करुन मारहाण करायची आहे व गावात उघडे करून दिंड काढायची आहे. या भितीने मी माझा जिव वाचवून पळून गेलो व पोलीस स्टेशन गाठले, झालेला सर्व प्रकार ठाणे अंमलदारांना सांगितल्यानंतर त्यांनी एनसीआर 0804/2025 दि.30/12/2025 रोजी दाखल करुन घेतली व मला समज देवून सांगितले तुझ्या जिवाला काही होणार नाही.
तसेच दुसर्या दिवशी दि.31/12/2025 रोजी गावातील काही पालकांना घेवून मी शाळेत गेला असता तेथेही पुन्हा त्यांनी आरेरावीची भाषा केली व मी मनोजदादा जरांगे यांचा कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या गळ्यातील रुमाल पाहून मला मराठा योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या नावे शिवीगाळ केली व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. संबधीत संस्था चालक पालकांना फि न मागता लहान मुलांना वेठीस धरून तुझ्या वडिलांकडून शाळेची संपुर्ण फि घेवून ये नसता शाळेत येवू नको, अशा धमक्या व दम देतात. त्यामुळे लहानमुले शाळेत जाण्यास घाबरत आहेत, सदरील संस्था चालक शाळेच्या आवारात किंवा शाळेला भेट देणार्या पालकांना शाळेत येवू देत नाही. त्यांची दहशत फार मोठी आहे.
स्वतः सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्याकडे बंदुकीचे लायसन्स आहे. त्याच्या जोरावर त्याचे कुटूंब व वाहन चालक आरेरावी करत असतात. संबधीतापासून मला व माझ्या पाल्यास व परिसरातील पालकांना भिती वाटत आहे व तो कधीही मला जिवे मारु शकतो. करीता मला पोलीस संरक्षण द्यावे व संबधीतावर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी श्री. येवले यांनी केली असून या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी जालना, मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, जि.प. जालना,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. जालना व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. जालना यांनाही दिल्या आहेत. तर या निवेदनासोबतच काही गावकर्यांची नावे व स्वाक्षर्या देखील आहेत.
























