सांगोला – महाविद्यालयातील भूगोल विभागाच्यावतीने करिअर मार्गदर्शन : संधींच्या जगात प्रवेश या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविकात प्रा.डॉ.अमोल पवार यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे महत्त्व पटवून दिले.
प्रमुख पाहुणे सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रातील संधी व त्यासाठी आवश्यक तयारी याबद्दल माहिती देत स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरित केले. तसेच बदलत्या काळातील विविध करिअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करत कौशल्य विकास, आत्मविश्वास आणि योग्य नियोजन यांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन करिअर घडवावे असे आवाहन केले. याप्रसंगी आपुलकी प्रतिष्ठानचे राजेंद्र यादव उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय डॉ.बी.एस.गायकवाड, सूत्रसंचालन प्रा.विकास उबाळे, किरण मोरे यांनी केले. आभार प्रा.शंकर पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूगोल विभागप्रमुख प्रा.संतोष कांबळे, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

























