तळणी : परिसरातील सासखेडा येथे पुर्णा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणारे ट्रॅक्टरसह किन्ही महसूलच्या पथकाने (ता. २६ ) जानेवारी रोजी रात्री ८ वा. पकडली.
ही कारवाई तहसीलदार सुमन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा नायब तहसीलदार कल्याण काळदाते व सचिन कळणे यांनी केली.
या कारवाईतील ट्रॅक्टर श्याम जाधव (रा. सासखेडा ) यांच्या मालकीचा आहे. सासखेडा येथून शेकडो ब्रास वाळू उत्खनन करुन विक्री केल्याप्रकरणी ‘त्या’ किन्हीसह ट्रॅक्टर मालकी विरुद्ध गुन्हा दाखल करुन दंडात्मक कारवाई होणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


























