नवीन नांदेड प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक तथा सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी सामाजिक उपक्रमाद्वारे आपला वाढदिवस दिनांक ८ जलै रोजी दक्षिण मतदार संघातील धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
बालाजी पाटील भायेगावकर शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक तथा सरपंच प्रतिनिधी यांनी आपला वाढदिवस दिनांक ८ जुलै रोजी दक्षिण मतदार संघ परिसरातील प्राथमिक उप आरोग्य केंद्र भायेगाव, शिवशक्ती माध्यमिक शाळा काकांडी, प्राथमिक आरोग्य केंद्र जवाहर नगर तुप्पा, जिजामाता कॉलनी सिडको यासह अन्य धार्मिक स्थळाच्या ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावून आपला वाढदिवस साजरा करण्यात आला.
याचवेळी श्रीकांत ट्रेडिंग कंपनी भायेगावकर जवाहर नगर तुप्पा हैदराबाद रोड नांदेड या ठिकाणी वृक्ष वाटप करण्यात आले. सदरील झाडे वाटप परिसरातील गावोगावीच्या कार्यकर्ते यांना मोफत देऊन सदरील दिलेल्या झाडांचे संगोपन करून झाडे जगली पाहिजे, मोठी झाली पाहिजे याचा फायदा परिसरातील नागरिकांना भविष्यात नक्कीच होईल असे आश्वासन बालाजी पाटील भायेगावकर यांनी दिले. यावेळी सामाजिक, राजकीय, शासकीय सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती