सोलापूर : विव्हको प्रोसेस येथील महालक्ष्मी मंदिराचा 32 वा वर्धापन दिन मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा करण्यात आला.
१९९४ साली विव्हको प्रोसेस संस्थेच्या तत्कालीन कामगार संघटना वर्गणीतून या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. महालक्ष्मी देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या श्री महालक्ष्मी देवीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा ३२ वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने सकाळी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीस अभिषेक,अलंकार करण्यात आला. यानंतर होमहवन विधीचा कार्यक्रम झाला. भाविकांना प्रसाद देण्यात आला. सायंकाळी ६ वाजता १०८ सुवासिनींच्या हस्ते”श्री लक्ष्मीससहस्त्रनाम-कुंकूमार्चना” कार्यक्रम भव्यरित्या पार पडला.
याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुदर्शन कुरापाटी, विश्वस्त विजय मडुर,अशोक भाट,भावनाऋषी रापोल, श्रीनिवास गोली, बालाजी तुम्मा,राजाराम गाजुल, व्यंकटेश गोली मंदिराचे पुरोहित अर्चक हरिकृष्ण नल्ला उपस्थित होते.
















