पारध / जालना – जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील पारध शाहुराजां येथे जनसामान्यासाठी लढणारे संघर्षयोद्धा मा. केंद्रीय मंत्री कै. गोपीनाथ मुंढे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेची पुष्पहाराने मा. सभापती परमेश्वर पाटील लोखंडे. यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात येवून जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक दिलीप बेराड, संजय लोखंडे, संतोष पाखरे, सुरेश आल्हाट, गणेश तेलंग्रे, पवन लोखंडे, शरद आबा देशमुख, सुनिल बेराङ, नितीन लोखंडे, दत्ता लोखंडे, दामु आल्हाट, शंकर लोखंडे, गजु महाले, गणेश पाखरे, बबलु पठाण,अमोल लोखंडे. अमोल काटोले. शे. मोईन., संपत महात्मा काटोले, सागर श्रीवास्तव, अमोलभैय्या श्रीवास्तव, व असंख्य नागरिक मोठया संख्येने हजर होते.



















