वेळापूर – येथील लोकविकास इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये २ मार्च ते ८ मार्च महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी स्त्रीरोग व त्वचारोग तज्ञ डॉ .उर्मिला अभिजीत पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली सोनवलकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
याप्रसंगी शिवन्या बनकर, अहिल्या लवटे, आर्या फरतडे ,स्वरा माने या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच सहशिक्षिका ज्योती गाडेकर यांनी महिलांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल माहिती दिली.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली सोनवलकर यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच डाॅ. उर्मिला पाटील यांनी आरोग्य विषयक,व्यायाम ,अहार या विषयी विद्यार्थ्यांना व महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
महिला दिनानिमित्त मुलीसाठी आरोग्य मार्गदशन ,संगीत खुर्ची ,चित्रकला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक अमोल पांढरे, अजित बनकर, तसेच महिला पालक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी शिंदे तर आभार पूजा कुदळे यांनी मानले.






















