‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ संचालित दादरची छबिलदास शाळा नुकतीच शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. याचे औचित्य साधून संस्थेने मंगळवार, १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान अध्यक्ष डॉ. श्री. उल्हास कोल्हटकर भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध अभिनेते श्री बाळ धुरी व कळसुत्री बाहुल्यांचे निर्मितीकार श्री. रामदास पाध्ये यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या सोहळ्यानिमित्त आनंदाची पर्वणी म्हणजे संस्थेतील कला शिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन तसेच ‘छबिलदास कल्चर सेंटर’चे उद्घाटन व समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी ‘छबिलदास वॉल’ यांचे आयोजन व उद्घाटन संपन्न होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी केले आहे.