पंढरपूर – चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. २९ मार्च २०२६ रोजी साजरा होत असून, यात्रा कालावधी २३ मार्च ते ०२ एप्रिल २०२६ असा आहे. या यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (पासष्ठ एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दि. २३ मार्च पासून प्लॉट नोंदणी सुरु करण्यात आली आहे. संबधितांनी भक्तीसागर येथे प्लॉटची मागणी नोंदवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आले आहे.
चैत्री यात्रेला येणाऱ्या दिंड्यांमधील भाविकांच्या निवाऱ्याची सोय भक्तीसागर ( पासष्ठ एकर) येथे करण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र आदी सुविधा या ठिकाणी दिल्या जातात.या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्का लीन मदत केंद्र स्थापन करण्यात येते.
भक्तीसागर (पासष्ठ एकर) येथे भाविकांना मुलभूत सेवासुविधा पुरवण्यात येणार असून आपत्कालीन प्रतिसाद केंद्रातून भाविकांना सेवा देण्यात येणार आहे. यासाठी नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे (मो.क्र.९७६७२४८२१०), तसेच ग्राम महसूल अधिकारी प्रमोद खंडागळे (मो.क्र.९६५७२९०४०३) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

























