सोलापूर : अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या वतीने आयोजित माघवारी पायी दिंडी व पालखी प्रस्थान सोहळा साठे चाळ येथे भक्तिभावात पार पडला. यावेळी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीची महाआरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आली.
शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साठे चाळ, बुधवार पेठ येथे हा सोहळा पार पडला. अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर (महाराज) इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांतील दिंड्या एकत्र येत पारंपरिक पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री मार्कंडेय मंदिर येथे पूजनानंतर नॉर्थ कोट प्रशालेच्या मैदानात माघवारी पायी दिंडी व रिंगण सोहळा झाला. “ज्ञानबा–तुकाराम” जयघोषात पालखी साठे चाळ येथे दाखल झाल्यानंतर महाआरती करण्यात आली.
यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय सचिव ह.भ.प. बळीराम जांभळे, प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. ज्योतीराम चांगभले यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळ प्रदेश अध्यक्ष ज्योतीराम चांगभले , राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, प्रदेश उपाध्यक्ष किसन कापसे, प्रदेश सचिव मोहन शेळके, जिल्हाध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय पवार उपाध्यक्ष ,सचिन गायकवाड , दिनकर जगदाळे, गुरुसिद्ध गायकवाड, कीर्तनकार कृष्णा (महाराज) चौरे ,शिवानंद जाधव ,गुरुसिद्ध गायकवाड, महेश चौरे, ऋषिकेश झांबरे, अनिकेत जांभळे ,सचिन भोसले, अविराज जांभळे,, गोविंद ताटे , अजिंक्य मोरे, प्रभाकर झांबरे ,सचिन मस्के, अनिकेत भोसले, ऋषिकेश झांबरे, अभिषेक जाधव ,दशरथ जाधव ,कैलास मोरे ,नामदेव पाटील, किरण पाटील , सीमा जगदाळे, चारुशीला जगदाळे, नंदा साठे, रेखा लोखंडे, शारदा लोंढे ,संगीता जगदाळे ,प्रतीक्षा शुक्ला, शितल गवळी, लक्ष्मी गवळी, काजल चव्हाण, वैशाली फाळके ,पल्लवी चव्हाण, वैशाली ताटे, गीता धुमाळ, संगीता चव्हाण , राधिका जाधव ,सरिता गुंड ,मीरा माने, कमल ढोबळे ,छाया जाधव ,ऋतुजा सातपुते, ऐश्वर्या ताठे, शोभा साठे, अनिता चांगभले, वर्षाराणी चांगभले आदी उपस्थित होते. कार्यक्रमास वारकरी भाविक, नागरिक व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























