Saturday, March 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आदिवासी बांधवांचा विश्वास जिंकून परिवर्तन घडविले: डॉ. मंदाकिनी आमटे

तरुण भारतbyतरुण भारत
March 7, 2026
in education
0
आदिवासी बांधवांचा विश्वास जिंकून परिवर्तन घडविले: डॉ. मंदाकिनी आमटे
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – भामरागडच्या दुर्गम जंगलात काम सुरू केले तेव्हा रस्ते, वीज, पाणी अशी कोणतीही सुविधा नव्हती. आदिवासी बांधवांना आमची भाषा समजत नव्हती आणि आरोग्यसेवेची कोणतीही साधनेही नव्हती. मात्र सातत्याने सेवा दिल्यामुळे त्यांचा विश्वास जिंकता आला आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडू लागले, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांनी केले.

शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सातव्या नामविस्तार दिनानिमित्त तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘अहिल्यारत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, पदमश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, रोप आणि ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. अनिल घनवट यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.

डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या की, १९७२ साली विवाहानंतर पती डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे आदिवासी बांधवांसाठी कार्य सुरू केले. त्या काळी तेथील परिस्थिती अत्यंत कठीण होती. रस्ते, पूल, वीज, पाणी तसेच संवादाची साधने नव्हती. सुरुवातीला आदिवासी बांधवांना आमची भाषा समजत नव्हती. मात्र त्यांची भाषा शिकून आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली. अंधश्रद्धेमुळे अनेक जण मांत्रिकांकडे जात असत; परंतु सातत्याने उपचार करून विविध आजार बरे झाल्यानंतर लोकांचा विश्वास बसू लागला. आरोग्यसेवेबरोबरच शेती आणि शिक्षण क्षेत्रातही काम सुरू करण्यात आले. आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याची जाणीव झाल्यानंतर मुलांसाठी शाळा सुरू केली. आज त्या शाळेतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वी होत असल्याचे पाहून समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार दिल्यने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, वडील बाबा आमटे यांनी आनंदवनातून समाजसेवेची प्रेरणा दिली. त्या प्रेरणेनेच आम्ही हेमलकसा येथे आदिवासी बांधवांसाठी कार्य सुरू केले. सेवाभावाने सातत्याने काम केल्यास समाजाचा विश्वास संपादन करता येतो. कोणतेही काम लहान समजू नये; मनापासून आणि समर्पित भावनेने केलेल्या कार्यातूनच समाजात परिवर्तन घडते, असे ते म्हणाले.

डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी समाजपरिवर्तनाचा आदर्श घालून दिला. त्याच धर्तीवर डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, लोकाभिमुख समाजसेवा आणि न्यायप्रिय राज्यकारभाराचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार डॉ. मंदाकिनी आमटे यांना प्रदान केल्याने पुरस्काराची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे. यंदापासून हा पुरस्कार देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून तरुणांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

नामविस्तार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, लोकवादन, ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन, निबंध स्पर्धा, लोककला सादरीकरण तसेच वृक्षारोपण आदी कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमास उद्योजिका सुवासिनी शहा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, पद्मजादेवी मोहिते पाटील, एम. डी. कमळे, प्रा. सचिन गायकवाड, ऍड. मल्लिनाथ शहाबादे, यतिराज होनमाने, प्रा. जैनुद्दीन मुल्ला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.

फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सातव्या नामविस्तार दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘अहिल्यारत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी पदमश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे आदी.

Post Views: 22
Previous Post

जुळे सोलापूरच्या नाटय गृहाचा मार्ग मोकळा. #public #maharashtranews #solapurnews

Next Post

विश्वास जिंकत परिवर्तन घडविले – डॉ मंदाकिनी आमटे. #public #viral #maharashtranews

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विश्वास जिंकत परिवर्तन घडविले - डॉ मंदाकिनी आमटे. #public #viral #maharashtranews

ताज्या बातम्या

शिवराणी मदने हिची इन्स्पायर अवॉर्ड साठी निवड. #public #maharashtranews #solapurnews #viral

March 7, 2026

अजिंक्य शाळेचे विद्यार्थी सैनिक शाळेसाठी पात्र.. #public #maharashtranews #solapurnews #viral

March 7, 2026

डॉ .बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बैठक संपन्न. #public #maharashtranews #viral

March 7, 2026

विश्वास जिंकत परिवर्तन घडविले – डॉ मंदाकिनी आमटे. #public #viral #maharashtranews

March 7, 2026
आदिवासी बांधवांचा विश्वास जिंकून परिवर्तन घडविले: डॉ. मंदाकिनी आमटे

आदिवासी बांधवांचा विश्वास जिंकून परिवर्तन घडविले: डॉ. मंदाकिनी आमटे

March 7, 2026

जुळे सोलापूरच्या नाटय गृहाचा मार्ग मोकळा. #public #maharashtranews #solapurnews

March 7, 2026

डोळे भरून पाहिले अन ढसाढसा रडल्या खासदार ज्योती वाघमारे.. #public #maharashtranews #solapurnews

March 7, 2026

करकंब मध्ये महिला सक्षमीकरण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा.. #public #solapurnews #viral

March 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0718565

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697