तभा फ्लॅश न्यूज/ मंगळवेढा : मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज एका टँकर चालकाच्या निष्काळजी वाहनचालना मुळे गंभीर अपघात घडला. मंगळवेढा हद्दीत भरधाव वेगाने आलेल्या केमिकल टँकरचा ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला. या अपघातात टँकरमधील रसायन रस्त्यावर सांडल्याने परिसरात धोक्याचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. टँकर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.