तभा फ्लॅश न्यूज/ वाशी : वाशी तालुक्यातील हातोला येथे मागील सात दिवसापासून वडार समाजाच्या नागरिकाला जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी गावातील बबन फुलवरे हे स्वतःला व मुलाला जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी उपोषणास बसला होते.
बबन फुलवरे यांच्या मागणीनुसार त्यांच्याकडे कुठल्याही महसुली पुराव्याची नोंद नाही तरीही मला स्थानिक चौकशी करून मला जात प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी बबन फुलवरे यांची होती. त्यानुसार वाशीचे तहसीलदार म्हेत्रे यांनी स्थानिक माहिती घेऊन व मागील महसुली पुराव्याची पडताळणी करून येणाऱ्या चार दिवसांमध्ये आपणास प्रमाणपत्र मिळेल या शर्तीवर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषण सोडवतेवेळी वाशीचे नायब तहसीलदार श्रीकिशन सांगळे, शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर,विलास खवले,पारगावचे बीट अंमलदार राजू लाटे, हातोला येथील तलाठी प्रिया कस्तुरे आदी उपस्थित होते.