वेळापूर – आमदार उत्तमराव जानकर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही वेळापूर येथील सुन्नी मदिना मशीद येथे मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार (जेवण) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून आमदार जानकर यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत समाजात ऐक्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये वेळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रजनीश बनसोडे, रिपाईचे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, मुस्लिम जमातीचे अध्यक्ष खुदबुद्दीन कोरबू, सचिव जावेद मुलाणी, तसेच, रणजीत सरवदे, युवराज मंडले, प्रदीप सरवदे, विकी तीकोटे, स्वप्नील सरवदे, दीपक माने यांसह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या या इफ्तार कार्यक्रमातून सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला. इफ्तारच्या वेळी सर्व बांधवांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. त्यामुळे वेळापूरमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य व सलोख्याचे सुंदर दर्शन घडले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुस्लिम जमातीच्या वतीने आमदार उत्तमराव जानकर आणि उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.























