सोलापूर – सर्व शाखीय ब्रम्हवृंद आणि श्री याज्ञवल्य आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने तीर्थक्षेत्र पंढरपुरात सामुदायिक उपनयन (मुंज) संस्काराचे आयोजन रविवार दि. 3 मे 2026 रो करण्यात आल्याची माहिती मुख्य आयोजक राजन हिवरेकर गुरूजींनी दिली.
हल्लीच्या काळात महागाई आणि अन्य कारणांमुळे उपनयन संस्कार करणे जिकरीचे झाले आहे. ही गोष्ट लक्षात घेत तीर्थक्षेत्र पंढरपुरातील सर्व ब्रम्हवृदांनी मिळून आणि सोबतीला श्री याज्ञवल्य आश्रमाचे सहकार्य घेत या सामुदायिक सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या सोहळ्यात सनातन पद्धतीने शास्त्रोक्त, मंत्रोपचारात उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी तज्ज्ञ ब्रम्हवृदांचे अमूल्य सहकार्य प्रत्येक बटूस आणि त्याच्या माता-पित्यास लाभणार आहे. यामुळे सोळा संस्कारातील हा महत्त्वाचा संस्कार अतिशय पवित्र, वेदमंत्रोच्चारात पार पडणार आहे. अशी नामी संधी यानिमित्ताने सर्व इच्छुकांना उपलब्ध झाली आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्याच्या सुसूत्रतेसाठी, नेटकेपणासाठी, व्यवस्था करण्यास सोपे जावे यासाठी इच्छुकांनी नाव नोंदणी करावी, असेही यानिमित्ताने आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आयोजक स्वतः हिवरेकर गुरूजींकडे (9420093199) नावे नोंदविता येतील. आवश्यक ती माहिती मिळवता येईल. तसेच श्री याज्ञवल्य आश्रमाचे अध्यक्ष जयंत पुराणिक (9922022195), उपाध्यक्ष बाळकृष्ण धाराशिवकर (8668628962), याबरोबरच गणेश कुरुलकर गुरुजी (9028348095) यांच्याकडेही नावे नोंदविता येतील. इच्छुकांनी दि. 1 मे 2026 पर्यंत नावे नोंदवावीत, असे आवहन अध्यक्ष श्री. पुराणीक यांनी केले.
सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा हे धर्म, समाजकार्य आहे. यासाठी समाजातील दानशूरांनी आर्थिक हातभार लावावा. अशा उपक्रमांमुळे समाजात, विश्वात सनातन धर्माची ध्वजा अधिकाधिक उंचावते.
– राजन हिवरेकर, गुरूजी

























