पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य स्थापना दिनानिमित्त मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालयच्या जनतेला अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट केले आहे.
ईशान्येकडील या राज्याचा सातत्याने विकास होत राहू देत, अशी प्रार्थना त्यांनी केली. “मणिपूरच्या राज्य स्थापना दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला माझ्या शुभेच्छा. मणिपूरने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. या राज्याची संस्कृती आणि परंपरांचा आम्हाला अभिमान वाटतो. मणिपूरच्या सातत्याने विकास व्हावा, अशी मी प्रार्थना करतो.”
ईशान्येकडील राज्ये भविष्यात प्रगतीची नवीन शिखरे गाठू देत, असे ते पुढे म्हणाले. “मेघालयाच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. आजचा दिवस हा मेघालयाची अनोखी संस्कृती आणि तिथल्या जनतेने मिळवलेले यश साजरे करण्याचा आहे. येणाऱ्या काळात मेघालय प्रगतीची नवीन शिखरे गाठू देत.”
“त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. या राज्याचा अनोखा इतिहास आणि समृद्ध वारसा या राज्यातल्या लोकांनी साजरा करू दे. त्रिपुरातल्या लोकांना समृद्धी आणि सौहार्द्र लाभो.”