सातारा – इजराइल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता आपल्या सातारा शहरातही उमटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे स्वयंपाकासाठी घरोघरी लागणारे गॅस सिलेंडर यांची कमतरता भासू लागल्यामुळे घरोघरीही अनेक सातारकर नागरिकांना आता दुसरा पर्याय कोणता उपलब्ध करायचा हा प्रश्न पडला असतानाच सातारा शहरातील सुप्रसिद्ध अशा सुपनेकर भोजन प्रबंध आणि सुपनेकर अल्पोपहार या संस्थेमध्ये सध्या खवय्यांची उपासमार तसेच दररोज जेवणासाठी नित्यनेमाने येणाऱ्या नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी सुपनेकर परिवारांनी चक्क चुलीवर स्वयंपाक करून भोजन व्यवस्था तसेच अल्पोपरासाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थ बनवण्याची निर्मिती सुरू केली आहे.
सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील सुपनेकर भोजन प्रबंध या इमारतीमध्ये सध्या त्यांच्या स्वयंपाक गृहामध्ये विविध तज्ञ स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांकडून सौ.मीना सुपनेकर या भोजनाचे विविध पदार्थ चक्क चुलीवर बनवून घेत आहेत.
युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर काही दिवस अक्षरशः जादा दर देऊन गॅस सिलेंडर विकत घ्यावे लागले. मात्र या ठिकाणी येणाऱ्या सर्व भोजनातील ना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी चुलीवर हा स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले गेली तीन पिढ्या तब्बल 38 वर्षांची सेवा देणाऱ्या या परिवाराने संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर देशात एक चांगले घरगुती भोजन तसेच खवय्यांसाठी खमंग टेस्टी पदार्थ देण्याची परंपरा जोपासलेली आहे.
वस्तूतः पुणे, मुंबई येथील अनेक उपहारगृह रेस्टॉरंट, खानावळी या युद्धाच्या प्रकारामुळे बंद झाले असून अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ ही कमी करण्याचे प्रमाण दिसून येत आहे मात्र अशी ही साताऱ्याची अनोखी तर्हा आणि परंपरा जपणाऱ्या सुपनेकर परिवाराला याबाबत अक्षरशः सॅल्यूटच करावासा वाटतो. या चुलीवरच्या स्वयंपाकाला एक वेगळीच खमंग चव असल्याचे यावेळी सुपनेकर भोजन निवासचे प्रमुख नितीन सुपनेकर यांनी सांगितले आणि अनेक भोजनार्थींकडून या अतिशय चविष्ट पदार्थांची वाहवा होत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले .
सातारा येथील यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिरा नजीकच्या सुपनेकर भोजन आणि निवास प्रबंध येथे विविध प्रकारच्या चुलीवर स्वयंपाक तसेच अन्नपदार्थ व पोळ्या बनवताना स्वयंपाकी कर्मचारी महिला .सर्व फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.
























