सोलापूर – राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुल यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘कै. बाबुरावसा दत्तात्रयसा भुमकर आदर्श पत्रकार पुरस्कार’ संस्थेचे अध्यक्ष संजीव बिद्री व शालेय समितीचे अध्यक्ष राजू भुमकर यांनी जाहीर केले. पुरस्कार वितरण समारंभाचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून, दैनिक तरुण भारतचे वरिष्ठ उपसंपादक अविनाश गायकवाड व इतर पत्रकार बांधवांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्कारासाठी नागराज बगले, (संचारे), विनोद कामतकर (दिव्य मराठी), प्रभू वारशेट्टी (सकाळ), श्रीशैल भद्रशेट्टी (तरुण भारत संवाद), शरीफ सय्यद (पुण्यनगरी), संतोष चितापुरे (दैनिक पुढारी), विष्णू सुरवसे, (सुराज्य), प्रीतम पंडित, (न्यूज एटी एन), मनोज हुलसुरे (इन सोलापूर न्यूज), सोनू शहानूरकर ( बी.आर न्यूज चैनल), बाळकृष्ण दोड्डी (लोकमत), शेखर गोतसुर्वे (दैनिक नवराष्ट्र), नितीन पात्रे (ब्रेन न्यूज) यांचीही निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 10 जानेवारी रोजी सहस्त्रार्जून शैक्षणिक संकुल सभागृह येथे सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ शालेय समितीचे अध्यक्ष राजू भुमकर यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली व दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री व शालेय समितीचे अध्यक्ष राजू भुमकर यांनी केले आहे.
























