नवीन नांदेड – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अस्थीकलश दर्शन डेअरी चौक धनेगाव येथे दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता राष्ट्रवादीचे गंगाधर कवाळे यांनी अस्थीकलश दर्शन घेऊन व भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे विमान अपघातात शहीद झाले. यांच्या अस्थीकलश दर्शनासाठी त्यांची हस्ते महाराष्ट्रभर दादांच्या चाहत्या जनतेच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून अस्थीकलश दर्शन करण्यात येत आहे. दिनांक ३ फेब्रुवारी रोजी ही अस्थीकलश सकाळी ८:३० वाजता आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे जनसंपर्क कार्यालय वसंत नगर येथून पुढील जिल्हाभरातील दर्शनासाठी जात असताना. डेअरी चौक धनेगाव येथे राष्ट्रवादीचे गंगाधर कवाळे यांनी अजित दादा पवार यांच्या अस्थीकलश दर्शनासाठी डेअरी चौक धनेगाव येथे शेकडो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थित अस्थीदर्शन करण्यात आली.
अस्थीकलश डेअरी धनेगाव चौक येथून सिडको, चंदासिंग कॉर्नर, नायगाव, नर्सी, मुखेड, कंधार, लोहा मार्गी विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर देवस्थान येथे गोदाकाठी अस्थीकलश विसर्जन सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आले.सकाळी डेअरी येथील शोकाकून राष्ट्रवादी पक्षाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा,मा.आ. मोहनराव हंबर्डे, प्रवीण पाटील चिखलीकर, गंगाधर कवाळे, शिवराम पाटील घुरपडे, निलेश भालके, भगवान कवाळे, गफूर सहाब, तातेराव ढवळे, शिवाजी पुयड, नितीन शिंदे, शंकर शिंदे, कोंडीबा कवाळे, दौलत सावंत, उद्धव कवाळे, रमेश वाघमारे, कैलास शिंदे, प्रभाकर गायकवाड, शेख इमाम, शेख येजाज,शेख बाबू, लांडगे, अनिल कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.






















