पंढरपूर – पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘आरएनओ’ वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी दत्तात्रय देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. येत्या सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाची बैठक पार पडली.
यावेळी दत्तात्रय देशमुख यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये कार्याध्यक्षपदी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी, उपाध्यक्षपदी राजू मिसाळ, सचिव पदी दैनिक तरुण भारत संवादचे संतोष रणदिवे, खजिनदारपदी दैनिक सकाळचे भारत नागणे यांची निवड देखील करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष अभिराज उबाळे, पत्रकार महेश खिस्ते, सुनील दिवाण, प्रशांत आराध्ये, अतुल बडवे, अभय जोशी, सत्यविजय मोहोळकर, महेश भंडारकवठेकर, मंदार लोहोकरे यांच्यासह सचिन कसबे, विनायक हरिदास, संकेत कुलकर्णी, सुरज सरवदे, नितीन शिंदे, राजू मिसाळ, नागनाथ सुतार, दत्तात्रय खटवटे, राजकुमार घाडगे आदी उपस्थित होते.
























