[] हदगाव शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व शेख मुसा सेठ यांचे दुखद निधन []
हदगाव तालुका प्रतिनिधी:-
हदगाव शहरातील जानकीलाल राठी चौक येथील प्रतिष्ठित नागरिक तथा अजातशत्रू शेख मुसा सेठ यांचे आज दि.२० जुलै रोजी ११ ते १२ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्षी होते. त्यांच्या पार्थिव देहावर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हदगावतील कब्रस्तान येथे मुस्लिम रीतीरीवाज प्रमाणे अंत्यविधी करून अंत्यसंस्कार पार पडले.
हदगाव शहरातील जानकीलाल राठी चौक स्थित असलेले शेख मुसा सेट हे शहरासह पूर्ण तालुक्यात परिचित होते कोणत्याही समाजाचे कोणतेही काम असो ते त्यांना योग्य सल्ला देत होते किंवा अंमलबजावणी करण्यास भाग पाडत होते तसेच पूर्ण आयुष्यात आजातशत्रू म्हणून त्यांची शहरासह पूर्ण तालुक्यात परिचित होते. मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नी, २ मुले, १ मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या अकाली जाण्याने शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.