देगलूर – येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, देगलूर येथे दि. २१ जानेवारी रोजी (बुधवारी) श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोउत्सव २०२६ च्या बैठकीचे आयोजन करण्यात होते. या बैठकीत सर्वानुमते नामदेव पाटील थडके देगावकर यांची श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती २०२६ च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षापदासह समितीतील विविध पदांची निवड करण्यात आली. त्यात उपाध्यक्षपदी गजानन पाटील नागराळकर व ओमकार उल्लेवार, सचिवपदी राजू देशमुख ढोसणीकर, कोषाध्यक्षपदी डॉ. सुनील जाधव तर कार्याध्यक्षपदी ॲड. अंकुशराजे जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच स्वागताध्यक्षपदी खालेद पटेल, संघटकपदी बालाजी पाटील अंदेगाववाडीकर, सहसचिवपदी विशाल पवार, सहकोषाध्यक्षपदी संजय कांबळे, सहसंघटकपदी शेख असलम तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजीव ताटे यांची निवड करण्यात आली.
शिवस्मारक मार्गदर्शन समितीत अध्यक्ष ॲड. अंकुश देसाई देगावकर, २०२५ शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष मंगल पाटील, सचिव राजू पाटील मलकापुरकर यांच्यासह नितेश पाटील भोकसखेडकर, विठ्ठलराव भोसले, व्यंकट कांबळे, संतोष पाटील येरगीकर, नितेश पाटील, चंद्रकांत मोरे, अनिल कदम, जनार्दन पाटील बिरादार, दिलीप भडके व उमाकांत भुताळे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदस्य म्हणून दत्ता पाटील केरुरे, शहाजी बाबरे, सूर्यकांत येलबुगडे, सुनील थडके, गोविंद वट्टमवार, अनिरुद्ध देशमुख व गोविंद पाटील अंदेगावे यांची निवड करून कार्यकारिणी पूर्ण करण्यात आली. या वेळी ॲड. अंकुश देसाई देगावकर यांचे मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. अंकुश देसाई देगावकर, शशांक पाटील, जयदीप वरखिंडे, बालाजी पाटील इब्राहिमपुरकर, गजानन पाटील मुजळगेकर, आकाश वडजे, अत्री पाटील, गोविंदराव केरुरे, पांडुरंग पाटील, पांडुरंग थडके, नवनाथ पाटील, सदाशिव शिंदे, नरेंद्र पाळेकर, दिलीप थडके, संदीप शिंदे, दिगंबर जाधव, बंटी जाधव यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.


























