नविन नांदेड – मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही या घटनेच्या निषेधार्थ दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड च्या वतीने माता रमाई आंबेडकर चौक सिडको येथे निदर्शने करून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॅासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी.
प्रजासत्ताक दिनी मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान नाशिक येथे कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही या घटनेच्या निषेधार्थ दिनांक २७ जानेवारी रोजी वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड च्या वतीने माता रमाई आंबेडकर चौक सिडको येथे निदर्शने करण्यात आली यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी निदर्शनाद्वारे शासनाकडे करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य अक्षय बनसोडे, महानगराध्यक्ष गोपालसिंग टाक, जिल्हा महासचिव ॲड. वैभव लष्करे, सम्राराट आढाव, राज बुध्दे,शुध्दोधन कापसीकर,सोनु मगरे,बंटी कोकरे,संदीप बेरजे,कश्यप पोवळे,आकाश चव्हाण,आकाश सुर्यवंशी,पंकज हाटकर,गौतम राक्षसे,यशवंत गोणारकर,सुरेश गजभारे,नामदेव पांचाळ,यशवंत ढगे,रोहन राक्षसे,अतुल मांजरमकर,राजकिरण लोहबंदे,प्रकाश कांबळे,नितीन मांजरमकर आदींची उपस्थिती होती.

























