अक्कलकोट – सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट ते पंढरपुर माघ वारी पायी दिंडीचे प्रस्थान श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान येथुन अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते दिडीपुजन पुरोहित व्यंकटेश पुजारी यांच्या मंत्र घोषात सचिव आत्माराम घाटगे ‘ विश्वस्त महेश गोगी ‘ दिंडी चालकश्रीमुख जगदाळे शेख नुरोद्दीन दर्गाहचे पुजारी अहमदपाशा पिरजादे ‘ मेजर संदिप सलगरे विश्वनाथ सुतार , मनोज जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती पंढरीकडे दिंडी मार्गस्थ झाली .
पंढरीची वारी भक्ती महिमाचा अद्भुत चमत्कार असल्याचे गौरवोद्गार प्रथमेश इंगळे यांनी काढले . समर्थ पार्क सोसायटी येथील कै बाळासाहेब इंगळे स्मृती उद्यान येथे पायीदिंडी चे भजन पाऊल नामस्मरण झाले . भाविकाना अल्पोपहार करून दिडींचे प्रस्थान झाले.
याप्रसंगी कमल होटकर कृष्णा शिंदे मोहन बंदिछोडे पत्रकार राजेश जगताप पत्रकार स्वामीराव गायकवाड ‘ विजय शिंदे , शिवशरण टाके , बाबुराव पांचाळ ,धनराज पाटील ‘ मुरलीधर पाटील अनंत पाटील कृष्णा शिंदे सदानंद जाधव शशीकांत पाटील शिंदे हरि मुळे धोंडू राम पाटील नंदनुमार जगदाळे . ऋतुराज हिराकांत जामदार विश्वजीत मनोज जाधव महेश बंदिछोडे शैर्य विश्वनाथ सुतार शिवनेरी संदिप सलगरे हर्षवर्धन हादवे अभिरूप इंगळे विश्वजीत जाधव आदि उपस्थित होते .

























