तभा फ्लॅश न्यूज/माहूर : बहुतांश गावे ही घनदाट जंगलाने वेढलेली असल्यामुळे शिवारातील शेतीतील पिकांचे हरीण,
काळविट,रानडुक्कर यासह इतर काही वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.तर वन्यप्राण्यांचे शेतकऱ्यांवर,शेतमजूरांवर घातक हल्ल्याच्या घटनाही घडत आहेत.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून वनविभागाच्यावतीने अनुदान देण्यात यावे ,या मागणीसाठी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना दी.२५ जुलै रोजी लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख जितू चोले, तालुका संघटक सुशील जाधव,माजी सभापती डॉ. नामदेव कातले यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.