देगलूर : नगरपरिषदेच्या स्थायी व विविध विषय समित्यांची रचना, समित्यांवर सदस्यांचे नामनिर्देशन तसेच विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज दि २१ जानेवारी रोजी (बुधवारी) लोकनेते कै. मष्णाजी हुल्लाजीराव निलमवार सभागृहातीतील संपन्न झालेल्या विशेष सभेत करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या आदेशानुसार या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सभेचे अध्यक्षस्थान अनुप पाटील (उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी) नगरपरिषद देगलूर यांनी भूषविले. तर मुख्याधिकारी निलम कांबळे, नगराध्यक्षा विजयमाला टेकाळे आणि उपनगराध्यक्ष ॲड. अंकुश देशाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
या सभेत नगरपरिषदेच्या स्थायी व विविध विषय समित्यांवर परिषद सदस्यांची नियुक्ती करण्यात येऊन सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेनुसार स्थायी समितीच्या सभापतीपदी (पदसिद्ध) सौ. विजयमाला बालाजी टेकाळे (अध्यक्ष), नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी देशाई अंकुश सुरेशराव (उपाध्यक्ष), शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी कांबळे सुमंत रामचंद्रराव, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी, दयाडे पल्लवी रूपेश, पाणीपुरवठा व जलनिसारण समितीच्या सभापतीपदी कौरवार रत्नमाला रमेशराव आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी टेकाळे एकनाथ उर्फ बबलू शेषराव यांची निवड करण्यात आली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी श्रीमती मैलगिरे रोहिणी बालाजी यांची निवड झाली.
तसेच स्थायी समितीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून रोयलावर बालाजी गंगाराम, तोटावर योगेश्वरी लक्ष्मण आणि कांबळे मिनाक्षी व्यंकट यांची नियुक्ती करण्यात आली. या विशेष सभेस एकूण 31 नगरपरिषद सदस्य उपस्थित होते. सभेचे कामकाज मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे, करनिर्धारक सय्यद गौस हैदरसाब तसेच म. इम्तियाज हुसेन (सभा कामकाज विभाग) यांच्या उपस्थितीत पार पडले.
























