अककलकोट – श्री दत्तगुरू चे अवतार श्री स्वामी महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त श्री तीर्थक्षेत्र अक्कलकोटी स्वामी दर्शनार्थ वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर ‘ , बुधवार पेठ समाधी मठ , स्टेशन रस्ता राजेराय मठ , श्री गुरु मंदिर राम गल्ली , बॅगेळी स्वामी महाराज विश्रांती धाम येथे भाविक दाखल झाली आहेत . पहाटे ४ पासुन स्वामी नामाच्या जयजयकाराने अक्कलकोट नगरी नगर प्रदक्षिणा ने दुमदुमून गेली आहे .
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीने भाविका साठी दर्शन व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे . प्रसादिक वस्तुची दुकाने विविध साहित्यांनी सजली आहेत . भाविकानां दर्शन रांगेत उन्हा पासुन संरक्षर्णात मंडप उभारलेला आहे दक्षिण बाजुला नव्याने मोठा छत उभारले आहे . प्रकट दिन निमित्य पायी दिंडी पादुका पालखी सोहळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्री दाखल झाले आहेत स्वामी नामाच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला आहे .
. पोलीस निरिक्षक दिपक भिताडे यांच्या. . मार्गदर्शनाखाली पोलीस ,गृहरक्षक दल सह वाहतुक पोलीस फौजफाटा तैनात केला आहे . भाविकाना मार्गदर्शक फलक ‘ बॅरीकेट ‘ पार्कीग सोय करण्यात आली आहे . प्रासादिक वस्तु हार फुले पेढे चुरमुरे श्रीफळ बत्ताशे अष्ठगंध अगरबत्ती धार्मिक पुस्तके ग्रंथ स्टीकर फोटो अंगठी कंठी माळं किचेन पदक फोटो रुद्राक्ष स्पटीक माळ मुर्ती प्रासादिक लाडू चुरमुरे आदि विविध साहित्याची दुकाने लहान मुलांची खेळणी दुकाने साहित्याने सजली आहेत . नगर पालिका प्रशासन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात स्वच्छता व भाविकाना सुलभ वावर होणेसाठी आवश्यक ठिकाणी बॅरीकेट मार्गदर्शक फलक लाऊन जय्यत तयारी ठेवली आहे .


























