सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज बहुउद्देशीय मंडळ, बाळे येथील शिवजन्मोत्सव उत्सव अध्यक्ष धीरज थोरात यांची निवड करण्यात अली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज बहुउद्देशीय मंडळ, बाळे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीच्या अध्यक्षपदी नवनाथ पवार यांची निवड करण्यात आली. बैठकीत शिवजन्मोत्सवाच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून पुढील बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बाळे गावात होणाऱ्या उत्सवासाठी उत्सव उपाध्यक्ष नागेश मोरे, स्वप्निल जाधव, उत्सव कार्याध्यक्ष किरण सरवळे, उत्सव खजिनदार दिगंबर पोळ, उत्सव सचिव विशाल करंडे, पालखी सोहळा मिरवणूक प्रमुख आकाश ढोकळे, रक्तदान शिबिर प्रमुख तुळशीदास शिंदे, उत्सव सल्लागार व मार्गदर्शक राजकुमार इंगळे, शरद मोटे, विशाल पाटील, मंगेश घुले, रोहिदास शिंदे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व उत्सव पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले. या समाज बैठकीस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज बहुउद्देशीय मंडळ, बाळे अध्यक्ष प्रमोद दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

























