गौतम बुद्धांच्या अमर दृष्टीने अगणित पिढ्यांना दिशा दिली आहे. परंतु गौतम बुद्धांचे शेवटचे दिवस व बौद्ध धर्मात अतिशय महत्त्वाचे असलेले त्यांचे अवशेष ह्यांच्याबद्दल अनेक प्राचीन दंतकथा आहेत. ह्या अवशेषांभोवती असलेले गूढ उलगडण्यासाठी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ‘सीक्रेट’ या लोकप्रिय फ्रँचायजीच्या तिस-या भागासह सज्ज झाली आहे. ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स,’ डिस्कव्हरी चॅनलवर २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल होणार आहे. या निमित्ताने या माहितीपटाचे सूत्रधार सुप्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद …
१. पुन्हा एकदा वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसोबत काम करताना कसं वाटतंय ?
– वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या ‘सिक्रेट्स’ या फ्रँचायझी मध्ये काम करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. सिक्रेट्स ऑफ सिनौली आणि सिक्रेट्स ऑफ द कोहिनूर नंतर आता सिक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स साठी नीरज पांडे पुन्हा एकदा काम करण्यासाठी संधी मिळाली आहे. त्यांची दूरदृष्टी आणि अभ्यास माहितीपटाला आकार देण्यास हातभार लावते.
२. इतिहास हा विषय तुमच्या किती जवळचा आहे ?
– जेव्हा मी कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला तेव्हा मला नेहमी वाटायचे की यात वेळ वाया जातो आहे. मला आयुष्यात काय करायचे आहे या संदर्भात मी नेहमीच स्पष्ट होतो आणि मला असे वाटायचे की इतिहास आणि अभिनय यांचा काहीही संबंध नाही. पण एक कलाकार म्हणून तुम्ही आयुष्यात जे काही करता ते नेहमीच उपयोगी पडतं. आता जेव्हा मी डिस्कव्हरी सोबत ‘सिक्रेट्स’ सिरीज करत आहे, तेव्हा पुस्तके वाचण्याची आणि भूतकाळाचे विश्लेषण करण्याची सवय मला खूप मदत करते.
३. सिक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स साठी तुम्ही वेगळी अशी काही तयारी केली का ?
– यामध्ये आम्ही आवाजाचा एक वेगळा टोन वापरून पाहिला आहे. मला वैयक्तिकरित्या असे वाटले की ते गौतम बुद्ध आणि त्यांच्या वैशिट्यांशी जुळणारा आवाजाचा पीच वापरला पाहिजे, त्यामुळे ही डॉक्युमेंटरी पाहताना प्रेक्षक सुद्धा त्याच्याशी रिलेट करू शकतील. पण सौम्यपणे बोलताना, ते कंटाळवाणे होण्याची भीती नेहमीच असते. त्यामुळे, सौम्यपणा आणि कथेभोवती उत्सुकता निर्माण करत या माहितीपटाच्या सूत्रसंचालन करायचं शिवधनुष्य मी पेललं आहे असं म्हणायला हरकत नाही.
४. सिक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स या माहितीपटाबद्दल अजून काय सांगाल ?
– हा माहितीपट दर्शकांना बुद्धांच्या काळापर्यंत पोहोचवण्याचे वचन देते. त्यांचे जीवन आणि शिकवण यांचा प्रसार करत बुद्धांच्या ऐतिहासिक कालखंडाचा प्रवास दाखवते. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अवशेषांबद्दल आणि बुद्धांच्या शेवटच्या दिवसांबद्दलचा प्रवास हा माहितीपट प्रेक्षकांना दाखवतो.




















