दक्षिण सोलापूर – विद्यार्थी, पालक व नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात . हेलपाटे मारल्यानंतरही अनेक त्रुटी असल्यामुळे दाखले देण्यास विलंब होते. त्यामुळे राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबारामधून माळकवठे येथे एकाच दिवसात ११५ दाखले वाटप व अनेक योजनांचे लाभ देण्यात आल्याचे मंद्रूपचे तहसीलदार विष्णू बुटे यांनी सांगितले. माळकवठे येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार बुटे बोलत होते.
यावेळी भंडारकवठे जिल्हा परिषद सदस्या सविता उंबरजे, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत दुपारगुडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी, माळकवठेच्या सरपंच जयश्री सगरे, नायब तहसीलदार अश्विनी दराडे , निंबर्गी मंडलअधिकारी राणा वाघमारे, मंद्रूप मंडलअधिकारी ज्योतिबा पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विविध प्रकारचे ११५ दाखले वाटप करण्यात आले. कृषी विभागामार्फत ६ ट्रॅक्टर व शेती अवजारे वाटप करण्यात आले. घरकुलासाठी मोफत वाळू वाटप ४० लाभार्थी पत्र , सातबारा दुरुस्ती ५५ , लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी आणि इतर २६५ , संंजय गांधी निराधार व श्रावणबाळ निराधार योजने संदर्भात २१ लाभार्थ्यांचे मंजुरी व पुरवठा विभागातिल १८० लोकांचे नवीन कार्ड, नाव कमी जास्त अर्ज प्राप्त, महिलांचे आरोग्य तपासणी ११७ लोकांचे केले.
यावेळी ३५० नागरिक उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये शासनाचे विविध योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी राणा वाघमारे, तलाठी गणेश भुजबळ, राजेश विटेकर, निंगप्पा कोळी, किरण कोतुले, शिवा दुपारगुडे, पिराप्पा आवटे, राजू बगले, भाऊ गायकवाड, नेहरू कोकरे आदींनी परीश्रम घेतले. सूत्र संचालन तलाठी विश्वनाथ पवार यांनी केले.



























