अक्कलकोट – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उमरगे येथील प्रयोगशील शिक्षिका रिंकू अनंतराव जाधव (धस ) या गेल्या सोळा वर्षापासून सलग त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे दप्तर वह्या पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करून शाळेत एक आगळा वेगळा आदर्श उपक्रम राबविले आहेत.
प्रति वर्षाप्रमाणे यंदाही फेब्रुवारी २८ ला विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या खाऊचे वाटप केले आहे. त्यांच्या शैक्षणिक नवसंकल्पना नवोपक्रम हे नेहमी विद्यार्थी उपयोगी समाज उपयोगी असतात .हीच दप्तर वाटपाची संकल्पना त्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर केली होती.त्यात त्यांना जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता .याच संकल्पनेचा भाग म्हणून शासनाने सुद्धा दप्तर वाटप हा उपक्रम राबवण्याचे हाती घेतलेले आहे .
परीक्षा पद्धतीवर देखील जाधवर मॅडम यांनी विश्लेषणात्मक लिखाण केलेले आहे. त्यानंतर काही वर्गासाठी पास-नापास परीक्षा पद्धतीत बदल केले गेले आहे. अशा अनेक विविधांगी विषयानुसार त्यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी माता पालक उपस्थित होत्या .



























