महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंठा येथे फराळाचे वाटप…..
(वारकरी विद्यार्थ्यांमध्येच पांडुरंगाचे दर्शन — अजय अवचार)…… मंठा/ प्रतिनिधी : मंठा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना बुधवार ता. 17 रोजी फराळाचे वाटप करण्यात आले. पत्रकार संघाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबविला जातो. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून रोहयोचे माजी अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण, ॲड. शुभम पुणेकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली मदने महाराज, ह.भ.प. राम महाराज नालेगावकर यांची उपस्थिती होती.
व्यासपीठावर पत्रकार संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे, तालुकाध्यक्ष बालाजी कुलकर्णी उपस्थित होते. श्री विठ्ठलाच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांनी आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना फराळ वाटपाची परंपरा जोपासली. खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांमध्येच पांडुरंगाचे दर्शन घडल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज मदने, ह.भ.प. राम महाराज नालेगावकर यांनी आशीर्वचन दिले.
ॲड. शुभम पुणेकर यांनी उपस्थित सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार रमेश देशपांडे तर सूत्रसंचालन माजी जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष दायमा यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशमुख,आसाराम शेळके,मोसीन कुरेशी,लखन जयस्वाल,मानसिंह बोराडे,वसंतराव राऊत यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी श्रीपाद देशपांडे,हरीश जोशी,विश्वंभर कुलकर्णी, कैलास रायमुळे यांनी परिश्रम घेतले. आभार पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालाजी कुलकर्णी यांनी मानले.