अ.नगर : नियोजनपूर्वक काम केल्यास निश्चितच यश मिळते. त्याकरिता कामकाजाच्या नियोजनासाठी दैनंदिनी ( डायरी ) अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले.
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये तसेच वर्तमानपत्र कार्यालयांची माहिती – ई मेल आयडी असलेल्या महसूल मित्र दैनंदिनी 2026 चे प्रकाशन श्री गिते यांच्या हस्ते करण्यात आले.
दैनंदिनीचे हे १० वे वर्ष असून यातील माहिती अतिशय उपयोगी ठरत असल्याचे दैनंदिनीचे संपादक अभय ललवाणी यांनी सांगितले.
यावेळी श्री शनैश्वर देवस्थान – शनिशिंगणापूरचे सहायक अधिकारी तथा उप जिल्हा भूसंपादन अधिकारी क्रमांक ०१ – अतूल चोरमारे, राजशिष्टाचार अधिकारी स्वप्निल फलटणे, ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे उपस्थित होते.























