देगलूर : अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्रप्रमुख डॉ. बी. आर. कतुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे. महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागात पदवी,पद्व्युतर व पीएच.डी. पदवीसाठी विद्यापीठाचे मान्यताप्राप्त संशोधन केंद्र कार्यान्वित असून यात लोकप्रशासन विषयात अध्ययन, अध्यापन, लेखन व संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. डॉ. बी. आर. कतुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कांबळे नागेंद्र यांनी “एड्स जनजागृतीमध्ये आरोग्य प्रशासनाची भूमिका :समस्या व उपाय”, डॉ. सूर्यवंशी गोविंद मोतीराम यांनी “ पोलीस जनता व प्रसार माध्यम यांच्यातील संबंध नांदेड जिल्हा एक अभ्यास”, डॉ. तिरकमटे निवृती गोविंदराव यांनी “महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान : एक प्रशासकीय अभ्यास विशेष संदर्भ लातूर जिल्हा” तसेच डॉ. जाधव महादेव उत्तमराव यांनी ग्रामीण विकास प्रशासन व ग्राम विकास निधी एक चिकित्सक अभ्यास: विशेष संदर्भ लातूर जिल्हा आणि डॉ. देशमुख दिग्विजय व्यंकटराव यांनी “अवर्षणात प्रशासन व नागरिकांची भमिका : विशेष संदर्भ मराठवाडा या विषयावर संशोधन करून विद्यापीठात शोधप्रबंध सादर केले होते. तसेच डॉ. कोपोल्लू सादीप्ती हरिबाबू यांनी “The Interlink Between Good Governance and Public Policy : With Special Reference to Hyderabad District” या महत्वपूर्ण विषयावर संशोधन कार्य पूर्ण केलेले आहे. तसेच डॉ. कोकंकटवार बालाजी यांनी “ आदिवासी समाजाच्या आर्थिक विकासात लोकप्रशासनाची भूमिका”, डॉ. लखपत्रेवार सुभाष गणपतराव यांनी “शिवकालीन प्रशासन - एक अभ्यास” डॉ. जोगदंड बबन पंडितराव यांनी “ महाराष्ट्राच्या लोकप्रशासन विकासात यशदाचे योगदान एक अभ्यास” तसेच स्नेहल संतोषराव कुलकर्णी यांनी “ ग्रामीण विकास प्रशासनातील महिला अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका : समस्या व उपाय (विशेष संदर्भ नांदेड जिल्हा) "या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले आहे. सध्या लोकप्रशासन संशोधन केंद्रात डॉ.बी.आर. कतुरवार,डॉ.संजय देबडे, डॉ.दिलीप बंजारा व डॉ.गौरव जेवळीकर या चार संशोधन मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत.
लोकप्रशासन संशोधन केंद्राच्या या यशाबदल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सूर्यकांत नारलावार, देवेंद्र मोतेवार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य डॉ एम एम चमकुडे उपप्राचार्य डॉ व्ही जी शेरीकर , पर्यवेक्षक संग्राम पाटील व कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे
























