सोलापूर : डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी ‘ दिलासा ‘ हे पोर्टेबल ईसीजी उपकरण तयार केले आहे. हे उपकरण मोबाईलच्या आकाराचे असून खिशात मावणारे आहे.
भाभा अनुशक्ती संशोधन केंद्राच्या प्रगत तंत्रज्ञानावर हे उपकरण आधारित असून सामान्य नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे. अँड्रॉइड फोन ला जोडून सहजपणे काही सेकंदात इसीजी रेकॉर्ड करण्याची सुविधा या उपकरणात आहे. इसीजीत रिपोर्ट व्हाट्सअप द्वारे त्वरित डॉक्टरांना पाठवता येतो. डॉक्टर परळे यांनी पेटंट केलेल्या वेस्ट सोबत जोडून रुग्णांना घरीच इसीजीची देखरेख करता येते. हे उपकरण रुग्णांना घरी वापरण्यासाठी, डॉक्टरांना आपत्कालीन स्थितीत आणि दुर्गम भागात उपयुक्त ठरणार आहे.अशा प्रकारचे उपकरण भारतात प्रथमच बनवण्यात आले आहे. हे उपकरण डॉक्टर गुरुनाथ परळे, श्रीराम कुलकर्णी, प्रशांत सदावर्ते यांनी हेयान सोल्युशन्स च्या सहकार्याने तयार केले आहे.
एआय इंटिग्रेशनमुळे हृदयाच्या कार्याची कल्पना येऊ शकते ज्यासाठी सामान्यतः इको कार्डियोग्राफी सारखी महागडी तपासणी आवश्यक असते. तसेच या मशीनची किंमत पारंपारिक ईसीजी मशीनपेक्षा किमान ५०% स्वस्त असेल.लवकरच ही उपकरणे मार्केटमध्ये सहज रिते उपलब्ध करण्यात येणार असून याचे अनेकांनी फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे















