सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे येथील डॉ.सुनयना माळी यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रकाशनासाठी बेस्ट रिव्हिव्हर म्हणून इंनोवेटिव्ह पब्लिकेशन, नवी दिल्ली यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
डॉ.सुनयना माळी यांनी आफ्रिकन जर्नल ऑफ मेडिसिन अँड फार्मा रिसर्च व करंट ट्रेंड्स इन फार्मसी अँड फार्मासुटिकल केमिस्ट्री या दोन जर्नलचे विविध आर्टिकल्स रिव्हिव्ह केले.
या लेखांच्या उच्च दर्जाच्या, विद्वत्तापूर्ण आणि वेळेवर पुनरावलोकनातील त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा अनिता इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.



























