ईस्लापूर प्रतिनिधी
दि.12/8/2024
*भाजपच्या जिल्हासचिव पदी काशिनाथ पाटील शिंदे यांची निवड.*
इस्लापूर :- भाजपचे जेष्ठ नेते काशिनाथ पाटील शिंदे यांची भाजपच्या जिल्हासचिव पदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड. किशोर देशमुख यांनी शिंदे यांच्या नियुक्तीचे पत्र काढले असून आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते काशिनाथ पाटील शिंदे यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले आहे.
काशिनाथ पाटील शिंदे हे माजी मंत्री डि. बी.
पाटील यांचे अतिशय जवळचे मानले जातात.
भाजपचे काम गेल्या अनेक वर्षांपासून ते निष्ठेने करतात. इस्लापूर सर्कल च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत त्यांनी पक्षाला चांगले दिवस प्राप्त करून दिले आहेत. माजी मंत्री डि. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लापूर ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिंदे यांचा महत्वाचा वाटा आहे. पक्षाशी बांधलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही, पक्ष श्रेष्ठीने काशिनाथ पाटील शिंदे यांच्या कार्याची व निष्ठेची दखल घेऊन सलग दोन वेळेस जिल्हासचिव पदाची संधी दिली होती. आता तिसऱ्यांदा पक्षाने संधी दिली आहे. अखेर निष्ठावंत कार्यकर्त्याला न्या मिळाल्याची भावना व्यक्त होत असून विधान सभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नूतन जिल्हासचिव शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, माजी मंत्री डि. बी. पाटील, आमदार भिमराव केरम व जिल्हाध्यक्ष अँड. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत राहणार असून,
पक्षाने मला तिसऱ्यांदा संधी देऊन जिल्हासचिव म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही. असे काशिनाथ शिंदे यांनी सांगीतले. शिंदे यांच्या निवडीबद्दल किनवट विधान सभा प्रमूख बाबुराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, गोविंद अंकूरवाड, कपिल करेवाड, विवेक केंद्रे, विष्णू दराडे, शेखर चिंचोलकर, सागर पिसारीवार, विकास माहूरकर, लतीफ शेख, विकास डुकरे, गणपत कुरूडे यांच्यासह त्यांच्या मित्रमंडातून अभिनंदन व पुढील कार्यासाठी सुभेच्छा दिल्या आहेत.