मुदखेड – शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्रीनिवास दगडुलाल सोनी यांचे उतर प्रदेश अयोध्या येथे देवदर्शनाला गेले होते त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिनांक ३० जानेवारी सकाळी नऊ वाजता
निधन झाला आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ६६ वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं दोन मुली नातवंड असा परिवार होत.
श्रीनिवास सोनी हे धार्मिक वृत्तीचे नागरिक म्हणून ओळखले जाते ते भारतातील देवदर्शनाला जात असताना त्यांच्यासोबत शहरातील अनेक भक्त सोबत घेऊन दर्शनासाठी घेऊन जाण्याची सवयी होती.
आता सुद्धा त्यांनी मुदखेड शहरातील २० भक्तासोबत लक्झरी ट्रॅव्हल्स बांधून देवदर्शन करण्यासाठी गेले होते. प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वीच त्यांना अयोध्या इथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ही वार्ता समजतात मुदखेड शहरात व आजूबाजू परिसरात शोककळा पसरली आहे .
मध्यप्रदेश आयोध्याहून मुदखेड येथे दि. ३१ जानेवारी दुपारी रुग्णवाहिकाने दुपारपर्यंत येणार आहेत. मुदखेड येथे आज दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी सीता नदी हिंदू समशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.



















