सोलापूर : महापालिका निवडणुकी प्रभाग क्रमांक पाच मधून माझा तसेच प्रभाग क्रमांक चारमधून माझी पत्नी तसेच अन्य उमेदवारांचा पराभव झाला. जनतेचा हा कौल मी सन्मानपूर्वक स्वीकारतो.
पराभूत झालो तरी यापुढे सदैव लोकसेवेत राहणार आहे. आतापर्यंत मला जनतेने एखाद्या कुटुंबाप्रमाणे माझ्यावर प्रेम केले आहे, हे मी विसरू शकत नाही. या निवडणुकीत निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक चार व पाच मधील सर्व उमेदवारांचे मी हार्दिक अभिनंदन करतो.
सर्व कार्यकर्ते, लोकांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार आनंद चंदनशिवे यांनी दिली.

















