पंढरपूर – तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा विजयी करण्याचा निर्धार माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला. केवळ निर्धारच नाही तर यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विजयश्री मिळविण्यासाठी कामाला लागावे, अशी सूचना देखील केली.
भाजप व पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी रांझणी येथील महादेवाच्या मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, गेल्यावेळी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये परिचारक गटाचे ७ उमेदवार विजयी झाले होते. तर पंचायत समितीमध्ये १३ उमेदवार विजयी झाले होते; मात्र यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व जागा विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कामाला लागावे. महापालिका नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळाले आहे. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये निश्चितच यश मिळणार आहे, असा विश्वास देखील यावेळी परिचारक यांनी व्यक्त केला.
यावेळी जेष्ठ सहकारी दिनकरभाऊ मोरे, वामनराव माने सर,कल्याणराव बप्पा पाटील,दिलीप आप्पा घाडगे, युवराज पाटील, शशिकांत चव्हाण, कैलासराव खुळे सर, दिलीपराव चव्हाण, पंडितराव भोसले, हरिषदादा गायकवाड, प्रणव परिचारक, भारत नाना कोळेकर,बाबुराव जाधव, समाधान काळे, रतीलाल गावडे, प्रशांत देशमुख, विजयदादा देशमुख, भगवानराव चौगुले, राजू बापू गावडे, बाळासो सालविठ्ठल लक्ष्मण तात्या धनवडे, सुभाषराव माने, पोपटराव रेडे,तानाजीराव वाघमोडे, बाळासो शेख, बाळासाहेब यलमर, नरसाप्पा देशमुख बाळासो माळी, संतोष घोडके, सुभाष मस्के सर, हर्षल कदम, हरिभाऊ गावंधरे अभिजित कवडे, आदिनाथ देशमुख, राहुल पुरवत, तानाजी पवार, ॲड.संतोष देशमुख, हरिभाऊ फुगारे, सुदाम मोरे, जयसिंग भूसनर, संतोष भिंगारे , माणिक माने,नानासाहेब गोसावी, भैरूमामा माळी, अरुण घोलप, मोहन नागाटिळक, आबासो शिंदे, चंद्रकांत देशमुख, मुकुंद राजेउपाध्ये, संतोष देशमुख, ज्ञानदेव ढोबळे,सुनील भोसले , नंदकुमार वाघमोडे आणि नाना पाटील यांसह मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————-
चौकट : ( मागील वेळेपेक्षा यावेळी समीकरणे बदलली आहेत )
या अगोदर झालेल्या जिल्हा परिषद गटामध्ये परिचारक यांचे ७ तर विरोधकाचा १ तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये परिचारक गटाचे १३ व विरोधकाचे ३ उमेदवार विजयी झाले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. पंढरपूर तालुक्यातील मातब्बर नेते तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे, समाधान काळे, भोसे गावचे सरपंच गणेश पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असून या निवडणुकीकडे पुर्ण लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे.
——————-
चौकट : ( यावेळी करण्यात आला संकल्प )
प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवणे.शेतकऱ्यांच्या हाताला बळ देणे. ग्रामीण भागाचा कायापालट करणे.


























