वेळापूर – उघडेवाडी ग्रामस्थांनी फलटण पंढरपूर फलटण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वेळापूर येथील उघडेवाडी चौक येथून वेळापूर शहरात पालखी मार्ग क्रॉस करून शाळेसाठी मुलांना जावे लागते, वेळापूर शहर ही मुख्य बाजारपेठ असल्याने गावातून नागरिकांची, महिलांची नेहमीच जाणे येणे असते, पूर्वी पाच ते सहा वेळा या ठिकाणी अपघात झाल्याने nhai पंढरपूर विभागाला या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची उघडेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मागणी केली होती.
व याबाबत अनेक वेळा या विभागाकडे पाठपुरावा करून सुद्धा गतिरोधक बसवण्याबाबत वरील विभागाने दुर्लक्ष केल्याने या विरोधात शेवटी उघडेवाडी ग्रामस्थांनी दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी रस्ता रोकोची हाक दिली होती.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग पंढरपूर विभागाचे अधिकारी राऊत यांनी १७ जानेवारी रोजी सकाळी वेळापूर उघडेवाडी चौक येथे येऊन ग्रामस्थांची मागणी मान्य केली व पुढील काही दिवसांमध्येच वेळापूर उघडेवाडी चौकामध्ये गतिरोधक बसवला जाईल असे लेखी पत्र देऊन उघडेवाडी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करू नये अशी विनंती केली होती. ही विनंती उघडेवाडी ग्रामस्थांनी मान्य करून दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्ग पंढरपूर विभागाचे अधिकारी राऊत यांनी उघडेवाडी सरपंच सौ जिजाबाई गवळी व ग्रामस्थांना लेखी पत्र देऊन गतिरोधक बसवण्याचे काम वेळेत पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले. यानंतर उघडेवाडी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले. यावेळी
रवींद्र घोरपडे, तानाजी जगदाळे, नितीन चौगुले , दीपक माने देशमुख ,भाऊसाहेब चोरमले ,हनुमंत भगत, मल्लिकार्जुन कुरुडकर, सोमनाथ भोसले ,प्रदीप शहा ,बाबासाहेब कांबळे, मयूर जगदाळे ,सागर सस्ते, महादेव कोळेकर
महादेव वावरे, हनुमंत कदम, माधवराव कदम, देविदास जाधव, सोमनाथ भोसले, भोजनदास बाळापुरे, प्रभाकर भगत, आप्पा कोळेकर,
, ग्रामसेवक माने, भाऊसाहेब शहाजी गोडसे, सुवास गोडसे, शिवराज देशमुख, रोहित थोरात, व ग्रामस्थ उपस्थित होते.

























