पारध – येथील राजर्षी शाहू शैक्षणिक संकुलनामध्ये वर्ग 10 वी व 12 वी वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे अध्यक्ष स्थानी उपस्थितीत होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री डॉ. वैभव पाटील गायकवाड अध्यक्ष नेत्रसेवा मेडिकल रिसर्च & एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट भोकरदन उपस्थित होते, त्यांनी कमवा व शिका असा मोलाचा संदेश या प्रसंगी विध्यार्थ्यांना दिला.
डॉ. किरण मुळे एम. बी. बी. एस. एम. डि. स्व. दिनकराराव मुळे सोनोग्राफी सेंटर. धाड, खूप शिक्षण घेऊन मोठे व्हा आणि आपल्या आई वडिलांना विसरू नका व ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा असे मत व्यक्त केले. मा. श्री. डॉ. पूजा मुळे एम. बी. बी. एस. एम. डी. यांनी इतरांचे ऐकावे परंतु योग्य जे असेल तोच निर्णय आपण घ्यावा हा मोलाचा संदेश यावेळी दिला.
याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विवेक सोनुने, विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास लोखंडे, उपमुख्याध्यापक विवेक अवसरमोल, विवेक पऱ्हाड व मंगेश लोखंडे यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले.कनिष्ठ महाविद्यालयकचे प्राचार्य अमोल बांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच निलेश लोखंडे,अनिल लक्कस, विवेक पऱ्हाड, स्वप्नील वाघ, लता अवसरमोल, माधुरी विसपुते, प्रा धनराज भोसले, प्रा राजू धनवई, प्रा लक्ष्मण खरात, प्रा दिनेश कापरे, प्रा राजू शिंदे प्रा रामेश्वर पाडळे, प्रा रवींद्र पानपाटील, संजय दबडे, अधिकार पाटील, भागवत पानपाटील राहुल सुरडकर उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर आल्हाट यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक विलास लोखंडे यांनी केले यांनी केले.



















