तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : मुदखेड तालुक्यातील पार्डी वैजापुर येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदा कचरू मोरे या शेतकऱ्यानी वीष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा कचरू मोरे राहणार पार्डी वैजापूर येथील दोन एकर जमीन असलेला अल्पभूधारक शेतकरी असून गावा मध्ये नवीन मीटर बसविण्याचे काम चालू आहे या मीटरमुळे गोरगरीब नागरिकांना जास्तीचे बिल येणं हे परवडणार नाही याबाबत तोंडी सूचना महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना दिली होती परंतु माझ्या सूचनेची दखल न घेतल्यामुळे दि.२८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मुदखेड महावितरण कार्यालय परिसरात शेतकरी आनंदा कचरू मोरे यांनी विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला होता.
महावितरण कार्यालयाच्या परिसरात कोणीतरी विषारी औषध प्राशन केल्याचं दिसताच कार्यालयात उपस्थित असलेले अधिकारी यांनी मुदखेड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच बीट जमादार बलविर सिंह ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत विष प्राशन केलेल्या शेतकरी आनंदा कचरू मोरे यांना तात्काळ एका अँटो मध्ये टाकून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
विष प्राशन केलेल्या रुग्णाची अवस्था पाहून उपस्थित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल करण्यात आलं असल्याची नोंद मुदखेड पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली.
नवीन मीटर बसविण्याच्या मोहिमेवर बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी महावितरण कार्यालयास लेखी निवेदन देऊन नवीन मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नुकताच बारडकर यांनी दिला आहे.
आनंदा कचरू मोरे हा अल्पभूधारक शेतकरी असून याला नवीन मीटरचा बिल परवडणार नाही या कारणावरून महावितरण ला तोंडी सूचना देऊन सुद्धा बसविण्यात आल्यामुळे माझी दखल महावितरण प्रशासनाने न घेतल्यामुळे मला विषारी औषध घेण्यास भाग पाडला आहे म्हणून मी कार्यालया पुढे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अस आनंदा कचरू मोरे यांनी ग्रामिण रुग्णालयातून रात्री सात वाजताच्या दरम्यान डिस्चार्ज दिल्या नंतर मुदखेड येथे स्वतः मोबाईल विडीओ करून माहिती दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने महावितरण कार्यालयाकडून नव्याने मीटर बसविण्याचा प्रकार तात्काळ थांबवावा अन्यथा असच पुढे आंदोलन करणार असल्याचे आनंदा मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.