PM किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र सरकारने राबवलेली योजना आहे. या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट गरीब शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे आहे. अशातच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता केंद्र सरकार महिन्याच्या अखेरीस जारी करणार आहे.
PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत मिळत असते. शेतकऱ्यांना वर्षभरात 2000 रुपयांचे तीन हप्ते मिळतात. PM किसान योजनेची रक्कम केंद्र सरकारद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेच्या pmkisan.Gov.In या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.
पीएम किसान 16 वा हप्ता कधी येणार? :
पीएम किसान अंतर्गत आर्थिक रक्कम 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केला जाणार आहे. या तारखेला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा केली जाईल. मात्र PM किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे.