तभा फ्लॅश न्यूज : सेरिंटिक व रिन्यू पावर पवनचक्की कंपनीने शेतकऱ्याला दिले आश्वासन न पाळल्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून शेकडो शेतकऱ्यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची भेट घेऊन दि. (२८) जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या मागण्यासाठी अमरण उपोषण करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील शेतकरी वाशी तहसील कार्यालयासमोर (दि.२५) जून ते २ जुलै आठवडाभर आमरण उपोषण करावे लागले. शेवटी जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उपविभागीय अधिकारी संजय पाटील तालुक्याचे तहसीलदार प्रकाश मेहत्रे तसेच पवन चक्क्या कंपनीचे अधिकारी यांच्या समक्ष तालुक्यातील शेतकऱ्यांना (दि.३) जुलै रोजी बारा वाजेपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र आश्वासन देऊन आता बराच कालावधी उलटून गेला आहे तरी अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या सेरेंटीका, रिनिवल पावर सह अन्य कंपन्यांनी पूर्ण केल्या नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले आहे