इस्लापूर / नांदेड – किनवट तालुक्यातील ईस्लापूर परिसरात गेल्या दहा-बारा दिवसापासून बिबट्याच्या दहशतीमुळे परिसर सध्या भीतीच्या वातावरणात असल्यामुळे शेतकऱ्याचे रब्बी हंगामाचे कामे खोळंबले आहेत .
त्यामुळे जंगल व्यतिरिक्त शेत शिवारात हिस्त्र प्राण्याचे वावर वाढल्याकारणाने शेतकरी मुठीत जीव घेऊन शेतातील कामे करत असल्याचे चित्र आहे .
सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसाखाली हिमायतनगर तालुक्यातील वडगाव गावातील एका शेतकऱ्याला शेतात काम करत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला जवळच असलेल्या बैलाने बिबट्यावर धावून गेल्यामुळे मालकाला जिव वाचवल्याची वृत्त काही दिवसाखाली ऐकण्यात मिळाली या बिबट्याच्या हल्ल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी मजूरच मिळत नसल्याचे चित्र असल्यामुळे संबंधित वन विभागाने उपाययोजना करून दहशत माजवत असलेल्या बिबट्याची शोध मोहीम करून जेरबंद करावे .अशी मागणी परिसरातील . जनते कडून होत आहे .जिल्ह्यात बिबट्याची संख्या अधिकच वाढल्याची माहिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क पूर्व काम करावे अशी सूचना देखील संबंधित विभागाकडून केली जात आहे .
काय उपाययोजना करावे .
वनविभागाचे आवाहन /
टार्चचा वापर करा , हातात घुंगराची काठी ठेवा , मोबाईलवर गाणे वाजवा ,लहान मुले व वृद्धांना बाहेर एकटे सोडू नका , पशुधन जाळी बंद बंदिस्तगोठ्यात बांधा, शेतात व घराबाहेर झोपू नका ,
कर्मचारी दिवसं रात्र पेट्रोलिंग मध्ये आहेत . अजून तरी आढळल नाही . संबंधित बाबी विषयी जागृतीचे पोम्प्लेट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे . तरीपण शेतकऱ्यांनी सतर्क रहावे . ग्रुप न राहावे ,गाणे वाजवावे ,एकमेकांशी बोलणे करावे . एकटे शेतात काम करण टाळावे . जे पिल्ले सापडले गेले ते रान मांजराचे होते .
वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे ‘ ईस्लापुर /

















