Thursday, March 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेतून राज्यातील पहिला विमा दावा मंजूर

Makrand Dhobalebyतरुण भारत
March 26, 2026
in editor
0
स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेतून राज्यातील पहिला विमा दावा मंजूर
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सामाजिक बांधिलकी जपत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांनी उल्लेखनीय कार्य करत स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना – विद्यार्थी-पालक अपघात विमा अंतर्गत राज्यातील पहिला विमा दावा मंजूर करुन घेतला आहे. महाविद्यालयाच्या तत्पर पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबाला अल्पावधीत आर्थिक मदत मिळाल्याने सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त होत आहे.

ना. चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली ही योजना संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. इंटिग्रेटेड रिस्क इन्शुरन्स ब्रोकर्स यांनी तयार केलेल्या पॉलिसीनुसार या योजनेच्या राज्यभर अंमलबजावणीसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी, पुणे ऑफिस-३ यांची निवड करण्यात आली आहे.

अवघ्या ७३ रुपयांमध्ये पाच लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण विद्यार्थी व त्यांच्या पालकांना उपलब्ध करुन देणारी ही योजना विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे.

बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर महाविद्यालयाने तात्काळ पुढाकार घेत फेब्रुवारी २०२६ मध्ये विमा दावा सादर केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नॅशनल इन्शुरन्स कंपनीने अवघ्या सात दिवसांत रु. ४ लाख ४० हजारांचा विमा दावा मंजूर केला.

नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर राहुल पाटील व डेप्युटी मॅनेजर सौ. अंजू शिंदे यांनी स्वतः महाविद्यालयात भेट देत मयत संजय अनभूले यांच्या कुटुंबीयांना दावा मंजुरी पत्र व टोकन धनादेश प्रदान केला, तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना या योजनेचे महत्त्व, अपघात विम्याची गरज व विविध सुरक्षा योजनांबाबत मार्गदर्शन करुन जनजागृती केली.

कार्यक्रमास शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय करंडे, प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

सदर विमा दावा मंजूर होण्यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. विशेषतः कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी आवश्यक कागदपत्रांची तत्पर पूर्तता करुन प्रक्रियेला गती दिली. विद्यार्थ्यांच्या कठीण प्रसंगी महाविद्यालयाने दाखविलेली संवेदनशीलता व जबाबदारीची भूमिका समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Post Views: 19
Previous Post

मुलींच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन; सेंट जोसेफ विद्यालयात विशेष जनजागृती

Next Post

सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post
सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

ताज्या बातम्या

ठिय्या; शिक्षण विभागातील प्रलंबित कामे न झाल्याने संताप उसळला!

ठिय्या; शिक्षण विभागातील प्रलंबित कामे न झाल्याने संताप उसळला!

March 26, 2026
सांगोला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

सांगोला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

March 26, 2026
सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

March 26, 2026
स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेतून राज्यातील पहिला विमा दावा मंजूर

स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेतून राज्यातील पहिला विमा दावा मंजूर

March 26, 2026
मुलींच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन; सेंट जोसेफ विद्यालयात विशेष जनजागृती

मुलींच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन; सेंट जोसेफ विद्यालयात विशेष जनजागृती

March 26, 2026
गांधीनगर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमित पत्र्यांची 2 घरे जमीनदोस्त

गांधीनगर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमित पत्र्यांची 2 घरे जमीनदोस्त

March 26, 2026
शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचे आंदोलन

शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचे आंदोलन

March 26, 2026
कुचन प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

कुचन प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

March 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0766991

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697