सांगोला – कडलास जि.प.गटाच्या शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने चिणके येथे माजी आ.शहाजीबापू पाटील यांनी गावभेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या विविध अडचणी जाणून घेत त्या तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
याप्रसंगी माजी जि.प.सदस्य अशोक शिंदे, माजी पं.स.सदस्य सुभाष इंगोले, माजी उपसरपंच मोहन मिसाळ, योगेश खटकाळे, युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील, उद्योगपती बाळासाहेब आसबे, आगतराव मिसाळ ,ग्रा.पं.सदस्य भिमराव मिसाळ, अशोक शितोळे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय मिसाळ, माजी ग्रा.पं.सदस्य कृष्णदेव मिसाळ, तानाजी कवठेकर, परमेश्वर गेजगे, लक्ष्मण येलपले, हणमंत येलपले, डॉ.बापू जाधव, बाळासाहेब कवठेकर, समाधान चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नारायण मिसाळ, साहेबराव मोहिते, माणिक मिसाळ, अंकुश मिसाळ उपस्थित होते.
शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये चिणके गावातून महायुतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन माजी आ.शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केले. या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकजुटीने काम करत कोणत्याही परिस्थितीत चिणके गावातून बहुमत देऊ असा निर्धार व्यक्त केला.
कडलास जि.प.गटातील नागरिकांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू तसेच या गटामध्ये शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न राहतील. या गटातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मतदार बंधू भगिनींनी उस्फूर्तपणे मला मतदान करून विजयी करावे. पुढील पाच वर्ष त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी.
-शोभा खटकाळे

























