मराठमोळ्या स्मृती मंधानाने सलग दुसऱ्या सामन्यात शतक ठोकले आहेत. दक्षिण आफ्रिकाविरोधात सुरु असलेल्या तीन वनडे सामन्यातील पहिल्या दोन्ही सामन्यात स्मृती मंधानाने शतकी खेळी केली. लागोपाठ दोन सामन्यात शतकं ठोकणारी स्मृती मंधाना पहिलीच भारतीय ठरली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात सलामी फलंदाज स्मृती मंधानाने शतकी खेळी केली. तिने 120 चेंडूमध्ये 136 धावांचा पाऊस पाडला. स्मृतीने पहिल्या वनडे सामन्यातही शतक ठोकले होते.
स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या शतकी खेळींच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये तीन विकेटच्या मोबदल्यात 325 धावांचा डोंगर उभारलाय. मालिकेत बरोबरी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघासोबत 326 धावांचे विशाल आव्हान आहे. स्मृती मंधानाने 136 तर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 103 धावांची झंझावती खेळी केली.